![]() |
| Add caption |
मित्रांनो आणि मैत्रिणिंनो आजची गोष्ट आपल्या एका मित्राच्या बाबतीत आहे त्याचे नाव सांगत नाही सरळ गोष्ट सुरु करु
"सोबत"
माझे गाव डोंगराळ भागात असल्याने दाट दर्याखोर्याँनी गुढ आहे. इथे खुप रहस्ये लपली आहेत जी इथल्या प्रत्येकाला नेहमी वेगवेगळे अनुभव देते. असाच एक अनुभव माझ्या आजोबांना आला होता.
आमचे शेत गावापासुन खुप दूर होते पण कोल्ह्या लांडग्यांच्या खुरापतीँमुळे पिकांच्या रखवालीसाठी रात्री शेतात जावं लागायचं.
माझे आजोबा आणि त्यांचे एक मित्र रोज दोघे मिळुन पहार्याला जात.
असेच एकदा माझे आजोबा पहार्याला जायला निघाले. त्या दिवशी अमावशा होती. त्यांचा मित्र त्यावेळी जेवत होता त्यामुळे आजोबांनी त्यांना तु जेवुन ये मी हळु हळू पुढे जातो असे सांगितले आणि ते पुढे निघाले. आजोबा बरेच पुढे गेल्यावर त्यांना त्यांच्या मागुन कुणीतरी येत असे जाणवले त्यांनी मागे वळुन पाहिले त्यांना अंधारात कुणीतरी येताना दिसले
वाटले त्यांचा मित्रच आला
ते म्हणाले काय रे आज उशीर लावला जेवायला तु ?
पण मागुन काही आवाज आला नाही
आजोबांनी पुन्हा विचारले काय रे चिडला का पुढे आलो म्हणुन ? तरी मागे सामसुम !
आजोबा आता चिडायला लागले होते ते रागात एखादि शिवी हासडणार इतक्यात त्यांचे लक्ष जमिनीवर गेले.तिथे कोहिच दिसेना म्हणुन त्यांनी मागे वळुन पाहिले तर तिथे कोणिच नव्हते त्यामुळे ते देवाचे नाव घेत जोरात पळत सुटले आणि वाचले.कारण त्यांना कळाले होते की ते भुत आहे

Comments
Post a Comment