Skip to main content

झपाटलेला बंगला" part - 1

आजची कथा आपल्याला एका सखीनी पाठवली आहे पण तिचे नाव उघड करु नये अशी तिची ईच्छा आहे त्यामुळे ते जाहिर करत नाही
तिचे मन राखुन आम्ही कथेला सुरुवात करत आहोत.
"झपाटलेला बंगला"
part - 1
मी आता पदविकेच्या शेवटच्या वर्षाला आहे.
माझ्या दुसर्या वर्षाची परिक्षा संपल्यावर म्हणजे मे महिन्यात ही घटना माझ्यासोबत घडली होती. त्यावेळी काही कारणास्तव मी माझी खोली सोडणार होते. सुट्टित मला एक class लावायचा होता त्यामुळे clas च्या जवळच मी खोली घेतली. त्या खोलीची मालकिण माझ्या मैत्रिणीची आई होती.
clas मी आणि माझ्या room-mate नी लावला होता. तिथे आमचा पहिला दिवस चांगला गेला. सगळं नीट होतं. आमच्या cls ला जाताना वाटेत एक बंगला लागायचा. तो पार करुन पुढे जावं लागायचं. तिथुन जाताना मला खुप अस्वस्थ वाटलं पण मी तिथे लक्ष न देता पुढे गेले. cls हुन येताना पुन्हा तेच जाणवलं पण मी लक्ष दिलं नाही. आम्ही खोलीवर आलो. साधारण रात्री ८ च्या सुमारास आमचे डब्बे आले. आम्हाला खुप भुक लागली असल्याने आम्ही लवकर जेवायचं ठरवलं. डब्बे धुण्यासाठी terrece वर जागा होती तिथे नळ आणि लहान कचरापेटी होती. माझ्या मैत्रिणीचं जेवण लवकर आटोपलं आणि ती डब्बे धुवून आली. थोड्या वेळानी मी डब्बे धुवायला वर गेले आणि डब्बे धुतल्यावर सहज माझं लक्ष त्या बंगल्याकडे गेलं. मी खुप वेळ तिथेच पाहात राहिले आणि माझी तंद्री लागली. माझ्या room mate च्या आवाजानी माझी तंद्री भंगली. मी खोलित आले आणि विचार करु लागले आणि त्यातच झोपले ते सरळ सकाळीच उठले. आणि खोली ते cls आणि cls ते खोली असा आमचा दिनक्रम सुरु झाला.
असंच एक दिवस मी रात्री डब्बे धुताना त्या बंगल्यातुन मला एका स्त्रिची किँकाळी ऐकु आली. मी तिथे पाहिले तर तिथे सगळं शांत होतं कसलिही हालचाल नव्हती

Comments

Popular posts from this blog

मराठी भूत कथा

Add caption मित्रांनो आणि मैत्रिणिंनो आजची गोष्ट आपल्या एका मित्राच्या बाबतीत आहे त्याचे नाव सांगत नाही सरळ गोष्ट सुरु करु "सोबत" माझे गाव डोंगराळ भागात असल्याने दाट दर्याखोर्याँनी गुढ आहे. इथे खुप रहस्ये लपली आहेत जी इथल्या प्रत्येकाला नेहमी वेगवेगळे अनुभव देते. असाच एक अनुभव माझ्या आजोबांना आला होता. आमचे शेत गावापासुन खुप दूर होते पण कोल्ह्या लांडग्यांच्या खुरापतीँमुळे पिकांच्या रखवालीसाठी रात्री शेतात जावं लागायचं. माझे आजोबा आणि त्यांचे एक मित्र रोज दोघे मिळुन पहार्याला जात. असेच एकदा माझे आजोबा पहार्याला जायला निघाले. त्या दिवशी अमावशा होती. त्यांचा मित्र त्यावेळी जेवत होता त्यामुळे आजोबांनी त्यांना तु जेवुन ये मी हळु हळू पुढे जातो असे सांगितले आणि ते पुढे निघाले. आजोबा बरेच पुढे गेल्यावर त्यांना त्यांच्या मागुन कुणीतरी येत असे जाणवले त्यांनी मागे वळुन पाहिले त्यांना अंधारात कुणीतरी येताना दिसले वाटले त्यांचा मित्रच आला ते म्हणाले काय रे आज उशीर लावला जेवायला तु ? पण मागुन काही आवाज आला नाही आजोबांनी पुन्हा विचारले काय रे चिडला का पुढे आलो म्हणुन ? तरी मागे सा...

Horror story in Pune

आजची आपली घटना पाठवली आहे स्मिता यादव यांनी, स्मिता च्या काका काकूंसोबत हि घटना घडली. काका काकू आणि त्यांची मुलगी सायली, एका लग्नासाठी पुण्याला गेले होते, ही घटना 2005 ची आहे. सायली 11 वी ला होती तेव्हा. रात्री उशिराने जेवण करून ते तिघे alto ने परत नगर ला यायला निघाले होते, रात्रीचे 11-साडे 11 वाजले असतील तेव्हा. सायली मागे झोपली होती, काका गाडी चालवत होते. पुण्याहून बरेच पुढे आले असतील ते, पुणे नगर हायवे पण अजिबात गर्दी नव्हती. अचानक त्यांना एक बाई हात करताना दिसली. तिच्या ह ातात एक पिशवी होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि एवढ्या रात्री ही बाई एकटी lift मागतेय ,काकांना जरा विचित्र वाटलं, पण काकू ला दया आली, काकूने गाडी थांबवून तिची चौकशी करू अस काकांना सुचवलं. काकांनी गाडी थांबवली, सायली गाढ झोपेत च होती. ती बाई म्हणाली " मला पुढच्या फाट्यावर सोडा, खूप उपकार होतील, घरी माझी पोर उपाशी आहेत,त्यांच्यासाठी खायला घेऊन चालले आहे". काकांना पण वाटलं थोडं च अंतर आहे, काकांनी त्या बाई ला मागे सायली शेजारी बसवले, आणि गाडी चालू केली. सायली अजून सुद्धा झोपलेली च होती, आपल्या शेजारी क...