आजची आपली घटना पाठवली आहे स्मिता यादव यांनी,
स्मिता च्या काका काकूंसोबत हि घटना घडली.
काका काकू आणि त्यांची मुलगी सायली, एका लग्नासाठी पुण्याला गेले होते, ही घटना 2005 ची आहे. सायली 11 वी ला होती तेव्हा.
रात्री उशिराने जेवण करून ते तिघे alto ने परत नगर ला यायला निघाले होते, रात्रीचे 11-साडे 11 वाजले असतील तेव्हा. सायली मागे झोपली होती, काका गाडी चालवत होते. पुण्याहून बरेच पुढे आले असतील ते, पुणे नगर हायवे पण अजिबात गर्दी नव्हती. अचानक त्यांना एक बाई हात करताना दिसली. तिच्या हातात एक पिशवी होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि एवढ्या रात्री ही बाई एकटी lift मागतेय ,काकांना जरा विचित्र वाटलं, पण काकू ला दया आली, काकूने गाडी थांबवून तिची चौकशी करू अस काकांना सुचवलं.
काकांनी गाडी थांबवली, सायली गाढ झोपेत च होती. ती बाई म्हणाली " मला पुढच्या फाट्यावर सोडा, खूप उपकार होतील, घरी माझी पोर उपाशी आहेत,त्यांच्यासाठी खायला घेऊन चालले आहे". काकांना पण वाटलं थोडं च अंतर आहे, काकांनी त्या बाई ला मागे सायली शेजारी बसवले, आणि गाडी चालू केली. सायली अजून सुद्धा झोपलेली च होती, आपल्या शेजारी कोणी बसलं आहे याची तिला जाणीव च नव्हती.
ते पुढे गेले, तसे काकूने त्या बाई ची चौलशी केली, कुठे राहते नाव काय, पण त्या बाई ने काहीच उत्तर दिले नाही. 10 मिनिट च झाले असतील, काकूने ती बाई का बोलत नाही हे पाहण्यासाठी मागे मान वळवली, आणि काकूंची बोबडीच वळली. मागे ती बाई नव्हती, आणि सायली सुद्धा गायब होती.काकांनी गाडी जोरात थांबवली, दोघांना ही प्रचंड धक्का बसला, काय झालं काय करावं काहीच सुचेना... काकांनी आस पास पाहिलं कोणी च नव्हतं. काकांनी गाडी वळवली, आणि रस्त्यांनी सायली ला आणि त्या बाई ला शोधत निघाले, काका काकूंना कळलं होत की सायली गायब झाली या मागे त्या बाईचा च हात असणार..
खूप शोधलं पण तरी ती दिसेना, शेवटी जिथे ती बाई भेटली त्या ठिकाणी ते पोचले, आणि पाहतात तर काय सायली रस्त्याच्या कडेला पडलेली होती, काका काकू धावत तिथं गेले पण सायली चा चेहरा रक्ताने माखलेला होता आणि सायली मृत झाली होती. तिच्या पूर्ण शरीरावर घाव आणि नखाचे वार होते. पोलीस आले, पंचनामा झाला, पोस्ट मॉर्टम झाला, जनावराने हल्ला केला असा सरळ अंदाज लावून पोलीस मोकळे झाले.
काका खूप हताश निराश झाले होते, खचले होते, पण त्यापेक्षा जास्त ते रागात होते.. ती बाई कोण होती.
सायली चे अंत्यसंस्कार झाले, पण काका स्वस्थ बसले नाही, ते त्या ठिकाणी गेले आसपास खूप चौकशी केली, तशी कोणी बाई त्या परिसरात कोणी पहिली नव्हती.
त्या ठिकाणच्या जवळ च एक छोटा ढाबा होता, त्या ढाबे वाल्या कडे काका चौकशी करत होते ,तेव्हा एका ते बोलणं एका वृद्ध व्यक्तीने ऐकले, आणि त्या माणसाने जे सांगितले ते ऐकून काकांची पायाखालची जमीन सरकली..
5 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी एका बाईचा अपघात झाला होता, ती बाई खायचं समान घेऊन घाईने घरी चाली होती, तीच लक्ष नव्हतं आणि एक भरदाव गाडीने तिला उडवले, ती जागेवर मृत झाली नव्हती.. पण ज्या गाडी ने तिला उडवला ती गाडी एक तरुण मुलगी चालवत होती आणि ती मुलगी मदत न करता निघून गेली, ती बाई तडफून मेली. तेव्हा पासून रात्री ती बाई दिसते, पण तिने आज पर्यंत कोणाला त्रास दिला नव्हता, ती फक्त लिफ्ट मागते आणि गायब होते... मग सायली सोबत नक्की काय झालं असेल, हा प्रश्न अजून ही सगळ्यांना भेडसावतो .

Comments
Post a Comment