Skip to main content

झपाटलेला बंगला part 2

झपाटलेला बंगला part 2
मला वाटले कि तिथे कुणीतरी असेल. पण तिथे कुणी नव्हते. मी हळुहळू त्या बंगल्याकडे आकर्षित होत होते. येता जाता तिथे बराच वेळ पाहत असायचे. असे वाटायचे की जणु कुणीतरी मला बोलावत आहे माझी वाट पाहत आहे पण मी तिथे लक्ष देत नव्हते.जितकं होईल तितकं मन दुसरीकडे वळवत होते कारण अशा गोष्टिंची मला खुप भिती वाटते.
मला दररोज किँकाळ्या ऐकु येत होत्या.मी माझ्या room mate ला किँकाळ्या ऐकु येतात का म्हणुन विचारलं असता ती नाही म्हणाली म्हणजे ते आवाज फक्त मलाच ऐकु येत होते.
ते आवाज मलाच का ऐकु येतात याचा मी खुप विचार करत होते त्यात एक दिवस माझी room mate ३ - ४ दिवसांसाठी गावी गेली. मी त्यादिवशी एकटी खोलीत होते cls लाही गेले नाही. कसाबसा दिवस घालवला तर रात्री पुन्हा ते रहस्यचक्र सुरु झालं .
रात्री ७ वाजता पुन्हा मला त्या किँकाळ्या ऐकु येऊ लागल्या मी खुप घाबरले आणि माझ्या मैत्रिणीला (घरमालकिनीच्या मुलीला) झोपायला बोलवलं. ती येईपर्यँत सगळे आवाज शांत झाले.
त्या रात्री मी न जेवता झोपले त्यावेळी १० वाजले असतील. मला पुन्हा त्या किंकाळिने जाग आली तेँव्हा घड्याळात पाहिले तर १२ वाजले होते.
खुप आवाज येत होते म्हणुन मी terrece वर गेले. पाहते तर बंगल्यात कोणी नव्हते. मी खुप वेळ अशी पाहात राहिले. तितक्यात मला जाणवले की माझ्यामागे कोणीतरी उभं आहे . . . ते हळुहळू माझ्या जवळ येउ लागले पण माझी मागे वळुन पाहायची हिम्मत होत नव्हती. ते माझ्यामागे अगदी जवळ आले आणि त्यानी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी खुप घाबरले पण ती माझी मैत्रिण होती. तिला पाहताच मला बरे वाटले. मी तिला त्या बंगल्याबद्दल विचारले असता तिचे उत्तर ऐकुन माझ्या पायाखालची जमिनच सरकली. तिने सांगितले कि त्या घरात एक नवरा बायको राहत होते.एकदा रागानी त्याने त्याच्या बायकोला ठार मारले पण थोड्या दिवसात तो हि दिसेनासा झाला . . .
ते आवाज मलाच का ऐकु येतात हे जाणुन घ्यायचं मी ठरवलं. दुसर्या दिवशी माझी मैत्रिण तिच्या मामाच्या घरी गेली. मी पुन्हा एकटी होते. मी त्याही रात्री जेवले नाही. रात्री पुन्हा ते आवाज ऐकु येऊ लागले पण आज मी तयार होते. मी उठले आणि बंगल्याकडे गेले मी पुढे जाणार तोच "थांब बाळ एकटी जाऊ नको तो राक्षस तुला ऐकणार नाही. आता पुर्वजन्माची परतफेड करायची वेळ आली आहे" असा आवाज ऐकु आला मी मागे वळुन पाहिले तर एक आजोबा दिसले. त्यांनी काही मंत्र म्हणले आणि बंगल्याचं दार आपोआप उघडलं गेलं. आम्ही आत जाताच उग्र वास येऊ लागला.अमानविय अस्तित्व जाणवु लागले. तिथे पंख्याला एक सडलेलं प्रेत लोँबकळत होतं. त्याच्या चेहर्यावर एक क्रुर हसु होतं. आजोबांनी माझ्या हातात एक तांब्या दिला आणि सांगितलं कि याने याच्या बायकोला तळघरात जिवंत जाळलं होतं तिथे जा आणि तिची रक्षा घेऊन ये. मी थोडी घाबरले तेंव्हा माझ्या गळ्यातल्या ताईतकडे पाहुन ते म्हणाले की घाबरु नको तुला काही होणार नाही. मी खाली तळघरात गेले तेंव्हा बाळ आलीस का ? खुप वर्षांपासुन वाट पाहात आहे तुझी असा आवाज आला. मी रक्षा घेऊन आले त्या दुष्टात्माने मला घाबरवण्याचा खुप प्रयत्न केला पण असफल झाला. आजोबा फरशीवर काही आक्रूत्या आखुन मोठमोठ्याने काही मंत्र म्हणत होते. थोड्यावेळाने ते बोलले की ती माती मी या प्रेतावरुन घेतली आहे यावर ती रक्षा टाक म्हणजे हा राक्षस कायमचा नाहिसा होईल. हे पाहुन तो आत्मा "ए म्हातार्या थांबव हे सगळं नाहितर सोडणार नाही मी तुला" असं ओरडु लागला. तो आजोबांच्यावर झेप घेणार तोच मी पुर्ण ताकदिने ती रक्षा त्या मातीवर टाकली आणि तो नाहिसा झाला.
तेँव्हा आजोबा बोलले की आता तासाभरात पहाट होईल त्याआधी हि रक्षा नदित विर्सजित करावी लागेल. मी लगेच रक्षा तांब्यात भरली आणि आम्ही जवळच्या नदिकडे गेलो. आजोबा माझ्या मागे उभे होते. मी रक्षा विर्सजित केली आणि मागे वळुन पाहिलं तर तिथे आजोबा नव्हते. कदाचित ते माझी मदत करण्यासाठी तिथे आले होते.
त्यानंतर मला पुन्हा कसलेहि आवाज ऐकु आले नाहित पण मला ते सर्व सारखं आठवत असे आणि भिती वाटे म्हणुन मी ती खोली सोडली. आता त्या बंगल्यात एक कुटुंब राहात आहे आणि खुप सुखी आहे !
धन्यावाद

Comments

Popular posts from this blog

झपाटलेला बंगला" part - 1

आजची कथा आपल्याला एका सखीनी पाठवली आहे पण तिचे नाव उघड करु नये अशी तिची ईच्छा आहे त्यामुळे ते जाहिर करत नाही तिचे मन राखुन आम्ही कथेला सुरुवात करत आहोत. "झपाटलेला बंगला" part - 1 मी आता पदविकेच्या शेवटच्या वर्षाला आहे. माझ्या दुसर्या वर्षाची परिक्षा संपल्यावर म्हणजे मे महिन्यात ही घटना माझ्यासोबत घडली होती. त्यावेळी काही कारणास्तव मी माझी खोली सोडणार होते. सुट्टित मला एक class लावायचा होता त्यामुळे clas च्या जवळच मी खोली घेतली. त्या खोलीची मालकिण माझ्या मैत्रिणीची आई होती. clas मी आणि माझ्या room-mate नी लावला होता. तिथे आमचा पहिला दिवस चांगला गेला. सगळं नीट होतं. आमच्या cls ला जाताना वाटेत एक बंगला लागायचा. तो पार करुन पुढे जावं लागायचं. तिथुन जाताना मला खुप अस्वस्थ वाटलं पण मी तिथे लक्ष न देता पुढे गेले. cls हुन येताना पुन्हा तेच जाणवलं पण मी लक्ष दिलं नाही. आम्ही खोलीवर आलो. साधारण रात्री ८ च्या सुमारास आमचे डब्बे आले. आम्हाला खुप भुक लागली असल्याने आम्ही लवकर जेवायचं ठरवलं. डब्बे धुण्यासाठी terrece वर जागा होती तिथे नळ आणि लहान कचरापेटी होती. माझ्या मैत्रिणीचं जेवण लवकर ...

मराठी भूत कथा

Add caption मित्रांनो आणि मैत्रिणिंनो आजची गोष्ट आपल्या एका मित्राच्या बाबतीत आहे त्याचे नाव सांगत नाही सरळ गोष्ट सुरु करु "सोबत" माझे गाव डोंगराळ भागात असल्याने दाट दर्याखोर्याँनी गुढ आहे. इथे खुप रहस्ये लपली आहेत जी इथल्या प्रत्येकाला नेहमी वेगवेगळे अनुभव देते. असाच एक अनुभव माझ्या आजोबांना आला होता. आमचे शेत गावापासुन खुप दूर होते पण कोल्ह्या लांडग्यांच्या खुरापतीँमुळे पिकांच्या रखवालीसाठी रात्री शेतात जावं लागायचं. माझे आजोबा आणि त्यांचे एक मित्र रोज दोघे मिळुन पहार्याला जात. असेच एकदा माझे आजोबा पहार्याला जायला निघाले. त्या दिवशी अमावशा होती. त्यांचा मित्र त्यावेळी जेवत होता त्यामुळे आजोबांनी त्यांना तु जेवुन ये मी हळु हळू पुढे जातो असे सांगितले आणि ते पुढे निघाले. आजोबा बरेच पुढे गेल्यावर त्यांना त्यांच्या मागुन कुणीतरी येत असे जाणवले त्यांनी मागे वळुन पाहिले त्यांना अंधारात कुणीतरी येताना दिसले वाटले त्यांचा मित्रच आला ते म्हणाले काय रे आज उशीर लावला जेवायला तु ? पण मागुन काही आवाज आला नाही आजोबांनी पुन्हा विचारले काय रे चिडला का पुढे आलो म्हणुन ? तरी मागे सा...

Horror story in Pune

आजची आपली घटना पाठवली आहे स्मिता यादव यांनी, स्मिता च्या काका काकूंसोबत हि घटना घडली. काका काकू आणि त्यांची मुलगी सायली, एका लग्नासाठी पुण्याला गेले होते, ही घटना 2005 ची आहे. सायली 11 वी ला होती तेव्हा. रात्री उशिराने जेवण करून ते तिघे alto ने परत नगर ला यायला निघाले होते, रात्रीचे 11-साडे 11 वाजले असतील तेव्हा. सायली मागे झोपली होती, काका गाडी चालवत होते. पुण्याहून बरेच पुढे आले असतील ते, पुणे नगर हायवे पण अजिबात गर्दी नव्हती. अचानक त्यांना एक बाई हात करताना दिसली. तिच्या ह ातात एक पिशवी होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि एवढ्या रात्री ही बाई एकटी lift मागतेय ,काकांना जरा विचित्र वाटलं, पण काकू ला दया आली, काकूने गाडी थांबवून तिची चौकशी करू अस काकांना सुचवलं. काकांनी गाडी थांबवली, सायली गाढ झोपेत च होती. ती बाई म्हणाली " मला पुढच्या फाट्यावर सोडा, खूप उपकार होतील, घरी माझी पोर उपाशी आहेत,त्यांच्यासाठी खायला घेऊन चालले आहे". काकांना पण वाटलं थोडं च अंतर आहे, काकांनी त्या बाई ला मागे सायली शेजारी बसवले, आणि गाडी चालू केली. सायली अजून सुद्धा झोपलेली च होती, आपल्या शेजारी क...